अनुसुचित जाती व नवबौध्द् प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 


अकोला,दि.22 (जिमाका) अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सन 2019-20धील ज्या पात्र विद्यार्थ्यांना प्रथम टप्याचा लाभ मिळालेला आहे व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापी द्वितीय टप्याचा लाभ मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी प्रपत्र 13 चे अर्ज परिपूर्ण भरुण ( प्राचार्याचे सहि व शिक्यानिशी) समाज कल्याण कार्यालयात बुधवार दि. 31 मार्च पूर्वी जमा करावे.  तसेच प्रपत्र 13 सादर करतांना विद्यार्थ्यांनी स्वत:चे बॅकेचे पासबूकचा पहिल्या पानांची छायाप्रत तसेच आधारकार्डची छायाप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ