1637 अहवाल प्राप्त, 410 पॉझिटिव्ह, 485 डिस्चार्ज, सहा जणांचे मृत्यू


         अकोला,दि. 17 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1637 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1227 अहवाल निगेटीव्ह तर 410 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 485  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सहा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 60 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 22708(18805+3726+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 134618 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 132153 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2086  नमुने होते. आजपर्यंत एकूण 134488 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 115683 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

410 पॉझिटिव्ह

           आज सकाळी २६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७२ महिला व १९३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २७, पारस येथील २२, कानशिवणी व मोठी उमरी येथील प्रत्येकी १०, हिवरखेड व पातूर येथील प्रत्येकी आठ, खडकी, कौलखेड, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व डाबकी रोड येथील प्रत्येकी पाच, जूने शहर, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, अडगाव, मुर्तिजापूर, टाकळी खोज, मलकापूर व बाळापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी, भौरद, किर्ती नगर, सिरसो, लहान उमरी, राम नगर, खोलेश्वर, डोंगरगाव, वाडेगाव व शिवाजी नगर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, आळशी प्लॉट, कैलास टेकडी, तापडीया नगर, शिवणी, देवरावबाबाची चाळ, तुकाराम चौक, जवाहर नगर, सुकळी, उरळ, टासली खुर्द, तोष्णीवाल लेआऊट, रणपिसे नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित आनंद नगर, कडोसी, व्हिएचबी कॉलनी, ओपन थेटर्स, गौतम नगर, धामणी, अकोट फैल, खैर मोहमद प्लॉट, अंदुरा, कुंभारी, एमआयडीसी, तारफैल, अंबिका नगर, रेल्वे कॉलनी, राहुल नगर, भिम नगर, शितला माता मंदीर, कान्हेरी सरप, हिंगणा फाटा, खदान, सोनटक्के प्लॉट, खिनखीनी, घुसर, पिंपळगाव, हाता, विद्या नगर, मंडुरा, कुंडा, पणज, दत्त कॉलनी, बालाजी नगर, वानखडे नगर, लहरिया प्लॉट, गुडधी, जठारपेठ, मोरेश्वर कॉलनी, कान्हेरी गवळी, मोरगाव, पार्थडी, सिरसोली, माता नगर, सुधीर कॉलनी, लकडगंज, केशव नगर, निमवाडी, तिवसा, मोहता मिल, अनिकट, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राजनखेड, रजपूतपुरा, गायगाव, देशमुख फैल, चिखलगाव व कृषी नगर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी १४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६९ महिला व ७६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खडकी येथील १५, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी  येथील नऊ, धनवडी येथील सात, कळबेश्वर येथील सहा, जठारपेठ येथील पाच, रामदासपेठ, रजपूतपुरा, जीएमसी हॉस्टेल, रवीनगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड, बोर्डी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी तीन, जूने शहर, मलकापूर, रेल, आदर्श नगर, न्यु खेतान नगर, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित बैद्यपुरा, अकोट फैल, मनकर्णा प्लॉट, न्यु राधाकिसन प्लॉट, नायगाव, देशमुख फैल, धारेल, चोहट्टा बाजार, नखेगाव, धामणा, पनोरी, खोलेश्वर मंदिर, जांभा, दहिगाव, खेतान नगर, रतनलाल प्लॉट, गिता नगर, शिवणी, न्यु तापडीया नगर, लहान उमरी, हरहिर पेठ, खदान, तोष्णीवाल लेआउट, अंभोरा, हेंडज, शेलू वेताळ, सिरसो, राऊतवाडी, पळसोबढे, गौतम नगर, सहकार नगर, मुंकूद नगर, टेलीकॉम नगर, निवारा नगर, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, संतोष नगर, गोडबोले प्लॉट, मेहरे नगर, केशव नगर, गोरेगाव, निमवाडी, व्हीएचबी कॉलनी, महान, शिवाजी नगर, वाशिम बायपास, अनंत नगर व शिव नगर, येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  

             दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 60 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 265, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 145 तर रॅपिड चाचण्यात 60 असे एकूण 470 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

485 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०, ओझोन हॉस्पीटल येथील  पाच, युनिक हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील दोन, हेंडज कोविड केअर सेटर मुर्तिजापूर येथील १४, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून दोन, अकोला ॲक्सीडेंट हॉस्पीटल येथून दोन, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, तर होम आयसोलेशन येथील ४१० जणांना असे एकूण ४८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

सहा जणांचा मृत्यू

दरम्यान आज सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात पळसोबढे, ता.बोरगाव मंजू येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातूर  येथील रहिवासी असलेली 80 वर्षीय महिला रुग्ण असून त्यांना दि. 16 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच टिटवा ता. बार्शीटाकळी येथील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल करण्यात आले होते, तर पोळा चौक, अकोला येथील रहिवासी असलेल्या 90 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी दोघांचे मृत्यू झाले. त्यात अकोट येथील रहिवासी असलेला 65 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 5 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य सावरा, अकोट येथील रहिवासी असलेला 80 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 17 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

5040 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 22708(18805+3726+177) आहे. त्यातील 413 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 17255 आहे. तर सद्यस्थितीत 5040  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ