रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 932 चाचण्यात 69 पॉझिटीव्ह


अकोला,दि. 11(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 815 चाचण्या झाल्या त्यात 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला येथे 209 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट येथे 141 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 15 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 34 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला महानगर पालिका येथे 200 चाचण्या झाल्या आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 95 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23 चाचण्या झाल्या दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 88 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बाळापूर येथे तीन, बार्शीटाकळी येथे चार, पातूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 815 चाचण्या 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 45 हजार 084  चाचण्या झाल्या पैकी  3488  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ