रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 367 चाचण्यात 56 पॉझिटीव्ह

 

अकोला,दि. 13(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.13) दिवसभरात झालेल्या 367 चाचण्या झाल्या त्यात 56 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोट येथे 96 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे एक चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 17 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 48 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 105 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, उपजिल्हा आरोग्य येथून 30 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 70 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे  एकूण 367 चाचण्या 56 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 45 हजार 433  चाचण्या झाल्या पैकी  3564  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ