सार्वजनिक वितरण व्यवस्था: एप्रिल महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित
अकोला,दि.19 (जिमाका)- जिल्ह्याकरिता माहे एप्रिल २०२१ करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा
अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.
अ.क्र. |
धान्याचा प्रकार |
वाटप परिमाण |
धान्य वाटपाचे किरकोळ दर |
१ |
प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु |
दोन किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो दोन रुपये |
२ |
प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ |
दोन किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो तीन रुपये |
३ |
प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी मका/ज्वारी |
एक किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो एक रुपया |
४ |
अंत्योदय योजना गहू |
नऊ किलो प्रति कार्ड |
प्रति किलो दोन रुपये |
५ |
अंत्योदय अन्न योजना तांदुळ |
२० किलो प्रति कार्ड |
प्रति किलो तीन रुपये |
६ |
अंत्योदय अन्न योजना मका/ ज्वारी |
सहा किलो प्रति कार्ड |
प्रति किलो एक रुपया |
७ |
एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु |
चार किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो दोन रुपये |
८ |
एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ |
एक किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो तीन रुपये |
९ |
नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता |
एक किलो प्रति शिधापत्रिका (साठा उपलब्धतेनुसार ) |
प्रति किलो वीस रुपये |
त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.
वरील वाटप परिमाण गोदामातील साठयाचे व लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा
पुरवठा विभागाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा