1567 अहवाल प्राप्त, 288 पॉझिटिव्ह, 227 डिस्चार्ज, चार मयत

 

         अकोला,दि.27 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1567 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1279 अहवाल निगेटीव्ह तर 288  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 227  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 188  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 26824(22000+4647+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 151990 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 149393,  फेरतपासणीचे 379  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2218  नमुने होते. आजपर्यंत एकूण 151890 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 129890  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

  288 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी २४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९३ महिला व १५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील १५, बार्शीटाकळी येथील १३, डाबकी रोड व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, तेल्हारा येथील १०, मोठी उमरी येथील नऊ, हिंगणी बु. येथील आठ, सिंधी कॅम्प, जठारपेठ व लहान उमरी येथील प्रत्येकी सात, देऊळगाव, कृषी नगर, राऊतवाडी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, गिता नगर, आदर्श कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी चार, किर्ती नगर, मलकापूर देहगाव, बाळापूर, तोष्णीवाल लेआऊट व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन, घुसर, रामदासपेठ, कारंजा राम, पातूर, धानोरा वैद्य, ताथोड नगर, गुडधी, खडकी, हिंगणा रोड, सावतवाडी, गोरक्षण रोड, बंजारा नगर, व्हिएचबी कॉलनी व आरोग्य नगर येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोकमान्य नगर, फडके नगर, महात्मा फुले नगर, हामजा प्लॉट, गणेश नगर, रहनपूर, शहापूर, रुधडी, रुईखेड, पोपटखेड, केळी वेळी, नयागाव, पीकेव्ही, कान्हेरी सरप, शिवाजी पार्क, रिधोरा, चांगलवाडी, सिरसोली, खंडाला, खैरखेड, मेहकर, ताजनगर, सिव्हील लाईन, रेणूका नगर, दत्त नगर, क्रांती चौक्, बोरगाव, रतनलाल प्लॉट, सूकोडा, उरळ, वाडेगाव, मुर्तिजापूर, विरवाडा, जूनाराधाकिशन प्लॉट, शिवणी, लीगल टॉकीज, इकबाल कॉलनी, सिद्धार्थ नगर, लाईपुरा, शिवाजी नगर, तिलक रोड, आश्रय नगर, हरिहर पेठ, सोनाला, जवाहर नगर, तारफैल, भौरद, तापडीया नगर, दहिगाव गावंडे, कोठारी, एमआयडीसी, न्यु जैन टेम्पल, कुंभारी, आळसी प्लॉट, वृंदावन नगर, जूने शहर, पिंजर, कौलखेड, इमरॉल्ड कॉलनी, कपिलवास्तू नगर, गायत्री नगर, रचना कॉलनी, चांदणी पोलिस स्टेशन, हिंगणा, शिलोड सुकोडा, कोठारी वाटीका, आपातापा, खदान व केशवनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बाळापूर येथील १०, पळसखेड येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, मंतरी बु. व पातूर येथील प्रत्येकी चार, नया अंदुरा येथील तीन, नंदापूर ता.मुर्तिजापूर येथील दोन, तर उर्वरित गायगाव, निंबा, खडकी, खानापूर ता.पातूर व अंभोरा ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.26) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 188 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 249, सायंकाळी प्राप्त अहवालात 39 तर रॅपिड चाचण्यात 188 असे एकूण 476 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  चौघांचा मृत्यू

दरम्यान आज चौघांचे मृत्यू झाले. त्यात तेल्हारा येथील ५५  वर्षीय पुरुष  रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज सायंकाळी तिघांचे मृत्यू झाले. त्यात लहान उमरी, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष रुग्ण असून त्याना दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होत, तर अन्य अकोली जहागीर ता.मुर्तिजापूर येथील ७४ वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते,  जूने शहर, अकोला येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला त्याना दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

227 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हारमोनी हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथून तीन, इंद्रा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, समाजकल्याण हॉस्टेल येथील २४, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील १३०, असे एकूण २२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6646 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 26824(22000+4647+177) आहे. त्यातील 443 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 19735 आहे. तर सद्यस्थितीत 6646 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ