एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा संपन्न

अकोला,दि.21 (जिमाका)-  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि. 21) रोजी जिल्ह्यात  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्ष18 उपकेंद्रावर  दोन सत्रामध्ये परिक्षा सुरळीत पार पडली. पहिल्या सत्रात परीक्षेकरीता एकुण 4 हजार 977 परिक्षार्थी  पैकी 3213 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1764 परिक्षार्थी अनुपस्थित होते. तसेच दुसऱ्या सत्रात परीक्षेकरीता एकुण 4 हजार 977 परिक्षार्थीपैकी 3202 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1775 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

   एमपीएससी परिक्षेकरीता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परिक्षेकरीता उपस्थित परिक्षार्थींना तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅनिटायर, फेसशिल्ड  इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. परिक्षाकरीता आलेल्या प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग व परीक्षा केंद्र सॅनिटाईझ करण्यात आले होते. प्रत्येक उपकेंद्रावर बेसीक कोविड किट (Basic Covid kit) व कोरोना विषाणुची लक्षणे दिसुन येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरीता Personal Protetive Eqipment Kit (PPEK)  ची व्यवस्था करण्यात आली होती.

एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार,  भुसंपादन अधिकारी विश्वनाथ घुगे, स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचे सहायक संचालक दि.अ.जवंजाळ, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांनी काम पाहिले.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ