ग्रामबाल संरक्षण समिती यांची मुर्तिजापुर येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


 

अकोला,दि.22 (जिमाका) राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे यांच्या आदेशानुसार मुर्तिजापुर तालुक्यातील अंगणवाडी सेवीकाचे ग्राम बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार दि.19 रोजी पंचायत समिती मुर्तिजापूर येथे घेण्यात आली.  त्यानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, मुर्तिजापुर तालुक्यातील मुर्तिजापुर येथील दोन, कुरुम दोन, पारद सर्कल निहाय 25 तथा जामठी बु. धोञा शिंदे, मुर्तिजापुर एक सर्कलनिहाय 25 ग्रामबाल संरक्षण समिती सदस्य सचिव, अंगणवाडी सेवीका उपस्थित होत्या.

या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी बायस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उईके प्रमुख मार्गदर्शक होत्या. या कार्यक्रमाला अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती. कंझरकर, सांख्यिकी अधिकारी राठोड उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यशाळेचे संचालन प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे समुपदेशक सचिन घाटे यांनी केले. तर कार्यशाळेमध्ये विधी तथा परिविक्षा अधिकारी ॲड. संगीता कोंडाणे, सामाजिक कार्यकर्ता सतिश राठोड यांनी ग्रामबाल संरक्षण समितीची भुमिका व जबाबदारी, बालविवाह, बालकामगार, बाललैंगीक अत्याचार अधिनियम 2012 विषयी मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ