रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 781 चाचण्यात 70 पॉझिटीव्ह

 


          अकोला,दि. 20(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 781 चाचण्या झाल्या त्यात 70 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 489 चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथील 17 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर येथे 114 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 65 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 58 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर तेल्हारा येथे 17 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 781 चाचण्या 70 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 49 हजार 003  चाचण्या झाल्या पैकी  4013 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ