1665 अहवाल प्राप्त, 238 पॉझिटिव्ह, 364 डिस्चार्ज, एक मयत


         अकोला,दि.25 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1665 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1427 अहवाल निगेटीव्ह तर 238  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 364  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर एक जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 201  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 25953(21366+4410+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 148412 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 145841,  फेरतपासणीचे 379  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2192  नमुने होते. आजपर्यंत एकूण 148312 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 126946 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 238 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी १९२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५० महिला व १४२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथे १८ ,डाबकी रोड येथे नऊ, मोठी उमरी येथे आठ, कौलखेड, मलकापूर व जठारपेठ येथे प्रत्येकी सहा, जीएमसी व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी पाच, गंगा नगर, कुंभारी, मानकी, मुर्तिजापूर, गौरक्षण रोड व खदान येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, माधव नगर, गिता नगर, पिंजर व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, हमजा प्लॉट, राऊतवाडी, शिवसेना वसाहत, देशपांडे प्लॉट, केशवनगर, खडकी, सिंधी कॅम्प, रेणूका नगर, बोरगाव मंजू, लहान उमरी, अकोट, तळेगाव, हुंडा, रामदासपेठ, खेळकर नगर, गायत्री नगर व खेडकर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रतनलाल प्लॉट, राजेश्वर नगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, नवाबपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बेलखेळ, शिवणी, पातूर, बिहाडमाथा, दगडपारवा, सुकळी, गजानन नगर, अकोट फैल, दुर्गा चौक, एमआयडीसी, कान्हेरी गवळी, सुकोळा, महात्मा फुले नगर, स्टेशन रोड, देगाव, नकाक्षी, पारस, इनकम टँक्स आफीस, बाबुळगाव, गुडधी, पैलपाडा, वरुनदेव नगर, तुलशी नगर, खोलेश्वर, गाडगे नगर, वाशिम रोड, जूने शहर, नीमकर्दा, आलेगाव, कोठारी वाटीका, मुकूंद नगर, भगतवाडी, बाईज हॉस्टेल, व्हिएचबी कॉलनी, मेहरे नगर, खापरखेड, गोरेगाव, सातव चौक, येवता, आसरा कॉलनी, मानकर हॉस्पीटल, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, खेतान नगर, तापडीया नगर, हिंगणा रोड, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, बाबुळगाव व कापसी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तोष्णीवाल लेआऊट व अकोट येथील प्रत्येकी पाच, सुधीर कॉलनी, शास्त्री नगर व खरप येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, गोकूल कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित एमआयडीसी, हेडा हॉस्पीटल, देशमुख फैल, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, बापू नगर, चिखलगाव, छोटी उमरी, जठारपेठ, जवाहर नगर, पंचशिल नगर, रामदासपेठ, आबेंडकर नगर, गजानन नगर, राम नगर, जीएमसी, माना, अडगाव, अंबाळा, बोराडी व कापसी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.24) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 192, सायंकाळी प्राप्त अहवालात 46 तर रॅपिड चाचण्यात 201 असे एकूण 439 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

 एकाचा मृत्यू

दरम्यान आज सायंकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जवळा, अकोला येथील ७८ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

364 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, सहारा हॉस्पीटल येथील सात, देवसारा हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील तीन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील चार, यकीन हॉस्पीटल येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील ३०४ जणांना असे एकूण ३६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6141 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 25953(21366+4410+177) आहे. त्यातील 435 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 19377 आहे. तर सद्यस्थितीत 6141 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ