रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1027 चाचण्यात 55 पॉझिटीव्ह


          अकोला,दि. 30(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.29) दिवसभरात झालेल्या 1027  चाचण्या झाल्या त्यात 55  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 12 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  अकोला महानगरपालिकेतून 1000  चाचण्या झाल्या त्यात 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे एक, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 1027 चाचण्यात 55 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 61 हजार 607 चाचण्या झाल्या पैकी 4961 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ