रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः ९१२ चाचण्यात ९७ पॉझिटीव्ह

           अकोला,दि. २३(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२२) दिवसभरात झालेल्या ९१२ चाचण्या झाल्या त्यात ९७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे ५४३ चाचण्या झाल्या त्यात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथे २४ चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे ४३ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मूर्तिजापूर येथे ६४ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे १६० चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी एक चाचणी झाली तो एक अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६९ चाचण्या झाल्या त्यात २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोला येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण ९१२ चाचण्यात ९७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ५० हजार ८४८  चाचण्या झाल्या पैकी  ४२१२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ