१२२७ अहवाल प्राप्त, २३५ पॉझिटिव्ह,५४७डिस्चार्ज, तीन मयत

       अकोला,दि.२३ (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १२२७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील  ९९२ अहवाल निगेटीव्ह तर २३५   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ५४७    जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर तीन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.२२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ९७  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या २५१०८(२०७८८+४१४३+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  १४५११७ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १४२५५६,  फेरतपासणीचे ३७९  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  २१८२  नमुने होते. आजपर्यंत एकूण १४४९४१अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  १२४१५३ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 २३५पॉझिटिव्ह

आज दिवसभरात २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सकाळी १३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४४ महिला व ८७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात शास्त्रीनगर येथील सात, जीएमसी आणि अकोट येथील पाच, तारफैल, शिवनी, बोरगाव मंजू, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, वाठुळकर लेआऊट, रणपिसेनगर, मोरगाव भाकरे, गिता नगर,  अंत्री, मोठी उमरी व खदान येथील प्रत्येकी तीन,  हरिहर पेठ, लोकमान्य नगर, वानखडे नगर, आळशी प्लॉट, मलकापूर, आनंदनगर, खडकी, बार्शी टाकळी, सांगळूद, बाभुळगाव, न्यू भिमनगर, नवरंग सोसायटी, डीएसपी ऑफिस, दुधलम व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तसेच अनिकट, रामी हेरीटेज, केशवनगर, चिखली रोड, उगवा, न्यू खेतान नगर, माझोड, मुंडगाव, देशमुख फैल, पंचगव्हाण, निंबी मालोकार,  पुनोती, वरोडी, शिवर, दहिगाव गावंडे,  साईनगर, केडीया प्लॉट, जठारपेठ,  माता नगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, बाळापूर नाका, सावरगाव, जुना आंदुरा, महाकाली नगर, भवानी नगर, पिंजर, जवाहर नगर,  डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी, सुकळी, तेल्हारा, धरसोडी, बलवंत कॉलनी, न्यु खेतान नगर, जुने शहर, अडगाव, हसनापूर ता. बाळापुर, महसूल कॉलनी, जिल्हा स्त्री रुग्णालय क्वार्टर, केळकर हॉस्पिटल, पिंपळगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

 

तर आज सायंकाळी १०४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला तर ८० पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात बार्शी टाकळी व कौल खेड येथील प्रत्येकी सहा, मलकापूर, जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी चार,  पातूर, सावरखेड, खडकी, शिवनी, गितानगर, जठारपेठ, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, टेलिफोन कॉलनी, गजाननगर, रतनलाल प्लॉट, केशवनगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड, म्हैसांग, बोरगाव मंजू, मुर्तिजापूर, सस्ती, रामदासपेठ, पिंपळखुटा आणि दगडपारवा येथील प्रत्येकी दोन तर शास्त्री नगर, अकोट, भंडारज, खानापूर, चांदूर, कॉग्रेस नगर, वनोजा, बाळापूर, न्यु तापडीया नगर, जुने शहर, शिरसोली,  कोठारी वाटिका, लहरिया नगर, रणपिसे नगर, दुर्गाचौक, एसडीओ ऑफिस, जागृती विद्यालय जवळ, आपातापा, कान्हेरी, महागाव, डोनद बु., खरप, गोकुळ कॉलनी, शेलू हातोला, आंबेडकर नगर,  आदर्श कॉलनी,  संतोष नगर, पंचगव्हाण,  जीएमसी, लाखनवाडा, रामनगर. रजपूतपुरा, तारफैल,  राऊतवाडी, जुने आर टी ओ ऑफिस, दगडी पुल, तोष्णिवाल ले आऊट  येथील प्रत्येकी एक या प्रमाणे  रहिवासी आहेत.

काल(दि.२२) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत ९७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  

 दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात १३१, सायंकाळी प्राप्त अहवालात १०४ तर रॅपिड चाचण्यात ९७ असे एकूण  ३३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज गवळीपुरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा  मृत्यू झाला. या रुग्णास दि.२२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर सायंकाळी खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. त्यात अकोट येथील ४९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णास दि.२० रोजी दाखल करण्यात आले होते. अन्य रुग्ण तर गंगानगर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 

५४७ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, होम आयसोलेशन मधील ४०० जणांना तर  कोविड केअर सेंटर तेल्हारा येथिल सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १२, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी येथील १२,  सूर्यचंदर हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेन्ट हॉस्पिटल येथील  तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, आयकॉन हॉस्पिटल येथील आठ, युनिक हॉस्पिटल येथील  तीन, सहारा हॉस्पिटल येथील तीन, अवघाटे हॉस्पिटल येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील  नऊ,  समाज कल्याण वस्तीगृह येथील १२,  स्कायलार्क हॉटेल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील  पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, देवसर हॉस्पिटल येथील एक तर आरकेटी हॉस्पिटल येथील सहा अशा एकून ५४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

५९६५ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २५१०८(२०७८८+४१४३+१७७) आहे. त्यातील ४३० जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या १८७१३ आहे. तर सद्यस्थितीत ५९६५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ