जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी आज(दि.16) सोडत

 


         अकोला,दि. 15(जिमाका)- जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे नव्याने आरक्षण निश्चित करण्याकरीता मंगळवार दि. 16 रोजी सोडत काढण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसिलदारांना दिले आहेत.

            यासंदर्भात तहसिलदारांना दिलेल्या निर्देशात नमुद केल्यानुसार जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी, सौंदळा, वांगरगाव, अकोट तालुक्यातील चोहोट्टा, सावरा, मक्रमपुर, मंचनपूर, पातोंडा, अकोला तालुक्यातील खांबोरा, बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड तर पातुर तालुक्यातील चरणगाव, दिग्रस खुर्द, आलेगांव, विवरा, चतारी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण सोडत पद्धतीने  काढण्यात यावे, त्यासाठी संबंधित तहसिलदारांनी मंगळवार दि. 16 रोजी तहसिल कार्यालयात सोडत घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

         अकोला जिल्ह्यात 224 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असुन दि. 9 व 11 फेब्रुवारी रोजी विशेष सभा घेऊन सरपंच-उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे. तथापि 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ