सर्तकतेचा इशारा

 

अकोला,दि.11(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार  (दि.14  मार्च) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये  हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. 

जिल्ह्यातील गावामधील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित राहून योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ