रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 408 चाचण्यात 55 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 4(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.3) दिवसभरात झालेल्या 408 चाचण्या झाल्या त्यात 55 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोट येथे 249 चाचण्या झाल्या त्यात 24
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 11 चाचण्या
झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,
मुर्तिजापूर येथे 28 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला
आयएमए येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तिघांचे
अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 85 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आला, तर अकोला येथे चार, बार्शीटाकळी येथे दोन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 408 चाचण्यांमधून 55
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 38 हजार 203 चाचण्या झाल्या पैकी 3005 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा