1998 अहवाल प्राप्त, 352 पॉझिटिव्ह, 96 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू


         अकोला,दि. 18 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1998 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1646 अहवाल निगेटीव्ह तर 352 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 96  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 23135(19157+3801+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 136619 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 134134 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2106  नमुने होते. आजपर्यंत एकूण 136486 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 117329 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

352 पॉझिटिव्ह

           आज सकाळी २३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ८० महिला व १५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तुकाराम चौक येथील २०, डाबकी रोड येथील १२, पातूर व लहान उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी आठ, मलकापूर, हरहिर पेठ व बाळापूर येथील प्रत्येकी सहा, तेल्हारा, मोठी उमरी, खदान, बार्शीटाकळी, व्याळा, कुंभारी, अकोट फैल, जामठा व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, खडकी, अनिकट, पुनोती बु., व्हिएचबी कॉलनी, पिंपळगाव, हाता, जूने शहर व शिवण खुर्द येथील प्रत्येकी तीन, राम नगर, जठारपेठ, अडगाव, गिरी नगर, आदर्श कॉलनी, गाडगे नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, पिंपळद, सिंधी कॅम्प, आनंद नगर, पोलिस क्वॉटर, जितापूर व एडंली येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, महाकाली नगर, चावरे प्लॉट, रणपिसे नगर, शिवणी, आळशी प्लॉट, खगारपुरा, बंजारा नगर, गायत्री नगर, काजळेश्वर, धोडगा, महान, सोपीनाथ पेठ, भिम नगर, अयोध्या नगर, चांदखॉ प्लॉट, लोकमान्य नगर, अपोती खुर्द, माळीपुरा, न्य भागवत प्लॉट, शिवर, पोळा चौक, रेणुका नगर, न्यु तापडीया नगर, कृषी नगर, तापडीयानगर, गड्डम प्लॉट, उरळ बु., नया अंदुरा, वाशिम बायपास, राधाकिसन प्लॉट, चिखलगाव, टेलीफोन कॉलनी, आपातापा, शिवसेना वसाहत, मनोरा, शिवाजी पार्क, खोलेश्वर, निम्म कर्दा, गंगा नगर, गांधी रोड, खैर मोहम्मद प्लॉट, बालाजी नगर, गिता नगर, जयहिंद चौक, शेलार प्लॉट, आलेगाव, दानापूर, वलगाव रोठे, तारफैल, पळसोबढे, अकोट, आझाद कॉलनी, इंदिरा कॉलनी, हिवरखेड, रवीनगर, रिंग रोड, माधव नगर, केशव नगर, मुर्तिजापूर, अंत्री बाळापूर, वाडेगाव व मुंडगाव येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी ११६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४० महिला व  ७६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पातूर येथील १२, मुर्तिजापूर येथील सात, कौलखेड येथील पाच, डाबकी रोड व गुडधी येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, शिवाजी नगर, वाशिम बायपास, सोनोरी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड, रवीनगर, खेतान नगर, विद्युत कॉलनी, तुकाराम चौक, कौलखेड जहॉगीर, अकोट, लहान उमरी, तापडीयानगर, गायत्री नगर, रणपिसे नगर, ज्योती नगर, मोठी उमरी, जामठी, केशव नगर, गाडगे नगर व महालक्ष्मी नगर येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित न्यु खेतान नगर, आयटीआय कॉलनी, जूने आरटीओ ऑफिस, वर्धमान नगर, डिएचडब्लू हॉस्टेल, अकोट फैल, जीएमसी, खडकी, खदान, खगालपूरा, न्यु भिम नगर, सत्यदेव नगर, रघुवीर नगर, गजानन पेठ, देहगाव माणकी, निबंधे प्लॉट, शास्त्री नगर, पिडब्यूर डी कॉटर, कोठारी वाटिका, सिरसो, गाजीपूर, शेलू बोंडे, शिवसेना वसाहत, गोडबोले प्लॉट, भोरद, हरीहर पेठ, गंगा नगर, शिवर, भारती प्लॉट, अनंत नगर, नवीन हिंगणा, लोकमान्य नगर व रामदासपेठ येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  

             दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 236, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 116 तर रॅपिड चाचण्यात 75 असे एकूण 427 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

96 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, कोविड केअर सेटर अकोट येथील सहाकोविड केअर सेटर बाळापूर येथील नऊ, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, बाईज हॉस्टेल अकोला येथील १३, तर होम आयसोलेशन येथील १० जणांना असे एकूण ९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात उरल ता. बाळापूर येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य माना ता.मुर्तिजापूर  येथील रहिवासी असलेला 58 वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज सायंकाळी वाडेगाव ता.बाळापूर येथील 72  वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि. 17 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

5368 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 23135(19157+3801+177) आहे. त्यातील 416 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 17351 आहे. तर सद्यस्थितीत 5368  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ