2183 अहवाल प्राप्त, 330 पॉझिटिव्ह, 84 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

 


         अकोला,दि. 20 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2183 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1853 अहवाल निगेटीव्ह तर 330 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 84  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 70 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 23866(19745+3944+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 140349 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 137825 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2145  नमुने होते. आजपर्यंत एकूण 140139 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 120394 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

330 पॉझिटिव्ह

           आज सकाळी २४७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ८४ महिला व १६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २९, गोरेगाव खु. येथील १६, राजंदा व पारस कॉलनी येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी व खारबडी येथील प्रत्येकी नऊ, बाळापूर व वागरगाव येथील प्रत्येकी आठ, पातूर व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी सहा, सारखेड ता.पातूर येथील पाच, खडकी, मलकापूर, किनखेड पुर्णा येथील प्रत्येकी चार, मारोती नगर येथील तीन, सुधीर कॉलनी, गोरक्षण रोड, रणपिसे नगर, वृंदावन नगर, कौलखेड, तेल्हारा, गोपालखेड, जठारपेठ, भौरद, पिंजर, वानखडे नगर, शिवणी, मोठी उमरी, निंबी मालोकर, जूने शहर, खदान, सांगवी बाझार, कान्हेरी सरप,  हाता, पैलपाडा, डाबकी रोड, व सिंधी कॅम्प येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित पिंपळखुटा, मुकूंद नगर, न्यु तापडीयानगर, अयोध्या नगर, कोठारी वाटीका, खेडकर नगर, तुकाराम चौक, यशवंत नगर, ग्रामपंचायतजवळ, शिवर, बिर्ला कॉलनी, रवी नगर, गिरी नगर, कोठारी वाटीका, रामदासपेठ, गायगाव, बलोदे लेआऊट, बोरगाव मंजू, टेलीफोन कॉलनी, शेलार फैल, देशमुख फैल, जैन चौक, पंकज नगर, अकशिल नगर, कलेक्टर ऑफिस, लहानउमरी, गोयनका लेआऊट, , हरिहर पेठ, दगडपारवा, महान, आरंदा, भेडगाव, मोडकेवाडी, कानशिवणी, काळा मारोती, फडके नगर, महाकाली नगर, सिव्हील लाईन, वाशिम बायपास, कटयार, अनिकट, श्रद्धा रेसिडेन्सी, रिधोरा, गायत्री नगर,नयागाव, बजरंग  चौक, हसनापूर, दाताळा, अमाखाँ प्लॉट, भारती प्लॉट, कैलास टेकडी, सहकार नगर, शिलोड, देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, जयहिंद चौक, गोरेगाव बु., चिखलगाव, जीएमसी, कळमेश्वर, समता नगर, जवाहर नगर, हनुमान नगर, आपातापा रोड, उमरी, रजपूतपुरा, उरळ, अकोट, केळकर हॉस्पीटल, अशोक नगर, अवामताळा व निंबा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ८३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २७ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, मुर्तिजापूर, खडकी व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, डाबकी रोड, वृंदावन नगर, खदान, मोठी उमरी, पक्की खोली, जीएमसी, संत नगर, गंगा नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित चांदुर, अशोक नगर, विठ्ठल मंदिरजवळ, न्यु जैन मंदिर, आळशी प्लॉट, केळकर हॉस्पीटल, अशोक नगर, बिर्ला कॉलनी, राऊतवाडी, लाल बंगला, बदलापूर, डिएचडब्ल्यु हॉस्टेल, सुकळी, हिंगणा रोड, संतोष नगर, कपिलवास्तु नगर, रजपूतपुरा, इनकम टॅक्स चौक, एमआयडीसी, जूने आरटीओ रोड, निमवाडी, वाशिम बायपास, पक्की खोली, खद, तुकाराम चौक, पळसोबढे, बोरगाव मंजू, वरखेड, बायपास, पुनोती खुर्द, सेंट्रल जेल, अकोली जहागीर, हिवरखेड, रिंग रोड, विद्या नगर, कंवर नगर, गोकूल कॉलनी, माधव नगर, गीता नगर, सुधीर कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

             दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 70 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 247, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 83 तर रॅपिड चाचण्यात 70 असे एकूण 400 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

84 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथून आठ जणांना, असे एकूण ८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात कृषी नगर, अकोला येथील ४८ वर्षीय  पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य गोरक्षण रोड, मलकापूर अकोला येथील ६८ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, पिंजर ता.बार्शीटाकळी येथील ६९ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

5775 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 23866(19745+3944+177) आहे. त्यातील 424 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 17667 आहे. तर सद्यस्थितीत 5775  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ