रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 865 चाचण्यात 53 पॉझिटीव्ह

 

अकोला,दि. 6(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.5) दिवसभरात झालेल्या 865 चाचण्या झाल्या त्यात 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोट येथे 289 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,बाळापूर येथे एक चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे 75 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 126 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 201 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 35 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 114 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोला येथे 12तेल्हारा येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 865 चाचण्यांमधून 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 39 हजार 668  चाचण्या झाल्या पैकी  3116  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ