2011 अहवाल प्राप्त, 346 पॉझिटिव्ह, 131 डिस्चार्ज, चार मयत


         अकोला,दि.26 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2011 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1665 अहवाल निगेटीव्ह तर 346  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 131  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 49  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 26348(21712+4459+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 150445 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 147862,  फेरतपासणीचे 379  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2204  नमुने होते. आजपर्यंत एकूण 150323 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 128611 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

  346 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 346 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६७ महिला व १७८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अंबुजा पारस व महान येथील प्रत्येकी १८, डाबकी रोड येथील १५, बाळापूर येथील १३, बार्शीटाकळी येथील ११, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर, जीएमसी व खदान येथील प्रत्येकी पाचपारस, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, एमआयडीसी, आपातापा रोड, रांजनखेड, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, मोठी उमरी, वाडेगाव व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, इंद्रा कॉलनी, गजानन नगर, बापू नगर, बेलखेड, पोपटखेड, शिवापूर, बायपास, तुकाराम चौक, व्हिएचबी कॉलनी, आदर्श कॉलनी, नायगाव, शिवणी, टाकळी व व्दारकानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गोयका नगर, रामदेव ट्रेडर्स, सिरसो, कौलखेड जहागीर, माळराजुरा, महाकालीनगर, शिवाजी नगर, गंगा नगर, गाडगे नगर, न्यु रमेश नगर, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, पंचशिल नगर, देशपांडे प्लॉट, तळेगाव बाजार, चांदुर, पंचगव्हाण, कारला, दानापूर, निंबी, मैत्रनगर, पाटखेड, हातोला, झोडंगा, लोहगड, पैलपाडा, अडगाव, खेतान नगर, सिवर, झेडपी कॉलनी, नित्यानंद नगर, बुरर्डाशिवसेना वसाहत, बुधाळा, हार्तुण,कौलखेड गोमासे, हाता, किर्ती नगर, गौतम नगर, जाजू नगर, मुर्तिजापूर, मोहता मिल, आबेंडकर नगर, इस्लाम चौक, न्यु भिम नगर, शेळद, बटवाडी, बोरगाव मंजू, आसर खेड, पळसी बु., कसूरा, सांगली मोहाडी, लोहारा, जवळा, अकोट, हिगणा, गोरक्षणरोड, हिंगणा फाटा, टाकळी रोड, ओपन थेटर्स, खैर मोहम्मद प्लॉट, दगडी पुल, उन्नती नगर, भगतवाडी, स्वालंबी नगर, ईस्ट झोन, खरप, गणेश नगर, तांदळी व केडीया प्लॉट येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी १०१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ६२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील सहा, मोठी उमरी येथील पाच, जीएमसी, जठारपेठ, कौलखेड जहागीर, रामदासपेठ, पातूर, मुर्तिजापूर व हरिहर पेठ येथील प्रत्येकी चार, अकोट फैल व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, ज्योती नगर, पिंपळखुटा, गोरक्षण रोड, राजुरकर कंपाऊड, माधव नगर, दुर्गवाडा व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बार्शीटाकळी, शिलोडा, बाबुळगाव, सहकार नगर, गोकुल कॉलनी, आळशी प्लॉट, जूने शहर, नवीन हिंगणा, कोठारी वाटीका, तापडीया नगर, न्यु राधाकिशन प्लॉट, मोहता मिल, सोनाळा, न्यु तापडीया नगर, शास्त्री नगर, चिंचखेड, खानापूर, भंडारज, गाडगे नगर, माळीपुरा, कान्हेरी सरप, आळदा, राम नगर, खदान, एडसी, शिवणी, झोडगा, महान, निंभोरा, मनोरक कॉलनी, दाताळा, गुलजारपुरा, हातगाव, सुदर्शन कॉलनी, एमआयडीसी, आदर्श कॉलनी, लहान उमरी, मोरकेवाडी, शिवनगर, गंगा नगर, जयहिंद चौक व डाबकी रोड येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.25) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 49 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 245, सायंकाळी प्राप्त अहवालात 101 तर रॅपिड चाचण्यात 49 असे एकूण 395 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  चौघांचा मृत्यू

दरम्यान आज चौघांचे मृत्यू झाले. त्यात खडकी, अकोला येथील ८४ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य वाडेगाव, बाळापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच आज सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात तारफैल, अकोला येथील ७० वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य गोरक्षण, मोहता मिल गेट, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

364 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३७, समाज कल्याण हॉस्टेल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, अवघाते हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील साततर होम आयसोलेशन येथील ५५ जणांना असे एकूण १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6401 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 26348(21712+4459+177) आहे. त्यातील 439 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 19508आहे. तर सद्यस्थितीत 6401 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ