रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 804 चाचण्यात 60 पॉझिटीव्ह

 

          अकोला,दि. 20(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.20) दिवसभरात झालेल्या 804 चाचण्या झाल्या त्यात 60 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 516 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  तेल्हारा येथील 13 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 129 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 26 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 88 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोला येथे पाच, बार्शीटाकळी येथे 15, पातूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 804 चाचण्या 60 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 49 हजार 804  चाचण्या झाल्या पैकी  4073 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ