रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 523 चाचण्यात 87 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 3(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.2) दिवसभरात झालेल्या 523 चाचण्या झाल्या त्यात 87 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 आज दिवसभरात अकोट येथे 296 चाचण्या झाल्या त्यात 38 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 53 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 13 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 10 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 42 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 71 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला येथे 26  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 523 चाचण्यांमधून 87 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 795  चाचण्या झाल्या पैकी  2950  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना