रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1680 चाचण्यात 69 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 7(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.6) दिवसभरात झालेल्या 1680 चाचण्या झाल्या त्यात 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला येथे 680 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे 152 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 18 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 237 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला महानगर पालिका येथे 242 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 182 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 117 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोट येथे 26 व आरोग्य कर्मचाऱ्यांचे 26 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 1680 चाचण्यांमधून 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 41 हजार 773  चाचण्या झाल्या पैकी  3202  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ