रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 600 चाचण्यात 58 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 5(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 600 चाचण्या झाल्या त्यात 58 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोट येथे 228 चाचण्या झाल्या त्यात 15
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे सात चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,
तेल्हारा येथे 28 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे
75 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला महानगरपालिका येथे 138 चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल
पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 32 चाचण्या
झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 70 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अकोला येथे 12 व पातूर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 600 चाचण्यांमधून 58 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 38 हजार 603 चाचण्या झाल्या पैकी 3063 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा