रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 694 चाचण्यात 73 पॉझिटीव्ह

 


          अकोला,दि. 19(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 694 चाचण्या झाल्या त्यात 73 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 296 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथील तीन चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 63 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर येथे 107 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 88 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 98 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोला येथे तीन, बाळापूर येथे चार, बार्शीटाकळी येथे नऊ, तर आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 694 चाचण्या 73 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 48 हजार 222  चाचण्या झाल्या पैकी  3943 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ