1307 अहवाल प्राप्त, 471 पॉझिटिव्ह, 385 डिस्चार्ज, दोघांचे मृत्यू

 

         अकोला,दि. 14 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1307 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 836 अहवाल निगेटीव्ह तर 471 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 385  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 66 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 21599(17861+3561+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 131269 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 128822 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2068  नमुने होते. आजपर्यंत एकूण 131140 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 113289 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

471 पॉझिटिव्ह

       आज सकाळी ३४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९९ महिला व २४१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील ४८, मुर्तिजापूर येथील २८, चोहट्टा बाजार येथील १५, लहान उमरी येथील १२, तेल्हारा व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, खडकी व अकोली जहागीर येथील प्रत्येकी १०, खदान येथील नऊ, जठारपेठ व वैराट  येथील प्रत्येकी आठ, वाडेगाव येथील सहा, रजपूतपुरा, आदर्श कॉलनी, कौलखेड, गुडधी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, खापरवाडा, पातूर, शास्त्री नगर, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार, केशव नगर, गायत्री नगर, सांगळूद, अकोट, अकोट फैल, जीएमसी व मोझर येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, रामदासपेठ, भारती प्लॉट, जूने शहर, मासा, निमवाडी, शासकीय निरिक्षणगृह, आनंद नगर, शासकीय महिला राज्यगृह, न्यु तापडीया नगर, रेल, रामटेक व पिकेव्ही क्वॉटर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पळसोबढे,  नयागाव, आगर, उगवा, सांगवी खुर्द, तापडीयानगर, निबंधे प्लॉट, गावंडगाव, माधव नगर, कासली खुर्द, मिर्झापूर, भगीरथ नगर, पिंपलोड, पांडुर्णा, शंकर नगर, बापू नगर, संतोष नगर, सुर्या गार्डन, हिंगणा फाटा, म्हाडा कॉलनी, झेडपी कॉलनी, ढेकर नगर, इंद्रा नगर, जवाहर नगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, ज्ञानेश्वर नगर, शिवनगर, जोगळेकर प्लॉट, शिवचरण पेठ, खंडाळा, जयहिंद चौक, विद्या नगर, जीएमसी गर्ल्स, दक्षता नगर, बाजोरिया हाऊस, सोळाशे प्लॉट, चैतन्य नगर, पंचशील नगर, शिवर, सोपीनाथ नगर, संता नगर, तारफैल, गुलजारपुरा, व्हीबीएच कॉलनी, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, अकोली, हरिहर पेठ, मराठा नगर, मुकूंदवाडी, गौतम नगर, आळशी प्लॉट, भौरद, पंचशिल नगर, वाझेगाव, धानोरी, कावसा, सिसो, द्रावहा, उमरी नाका, विझोरा, शिवापूर, कॉग्रेस नगर, राम नगर, मालीपूरा, राजीव गांधी नगर व यशवंत नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी १३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३० महिला व १०१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १८, विवरा येथील १५, जितापूर ता.मुर्तिजापूर व पातूर येथील प्रत्येकी नऊ, खडकी येथील पाच, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड, जूने शहर, डाबकी रोड, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, जवाहर चौक, शिवाजी नगर, रामदासपेठ, शिवणी, जीएमसी, चतारी, लहान उमरी, कान्हेरी सरप, न्यु तापडीया नगर, तापडीयानगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मोहम्मद अली चौक, गोडबोले प्लॉट, खरप, रेणूका नगर, गड्डम प्लॉट, तारफैल, तोष्णीवाल लेआऊट, बजरंग चौक, किर्ती कॉलनी, फिरदोस कॉलनी, केशव नगर, अगरबेस, बापू नगर, गुलजारपुरा, रजपूतपुरा, अंसर कॉलनी, वाशिम बायपास, कानशिवणी, साहू नगर, गायत्री नगर, गुरुदेव  नगर, महाकाली नगर, हरिहर पेठ, बोरगाव, बाजोरिया लेआऊट, इद्रानगर, पारस, मोरहल, तामसी, सावरगाव, कृषी नगर, सहकार नगर, तुकाराम चौक, कोठारी वाटीका मागे व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

        दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 66 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 340, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 131 तर रॅपिड चाचण्यात 66 असे एकूण 537 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

385 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून आठ, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून आठ, आर्युवेदीक रुग्णालयातून १६, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर, येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील २८० जणांना असे एकूण ३८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज सांयकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात करोडी ता.अकोट येथील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य शैलार फैल, अकोला येथील रहिवासी असलेला  76 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. 12  रोजी दाखल  करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

5184 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 21599(17861+3561+177) आहे. त्यातील 402 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 16013 आहे. तर सद्यस्थितीत 5184  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ