2151 अहवाल प्राप्त, 173 पॉझिटिव्ह, 233 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू


अकोला,दि. 9 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2151 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1978 अहवाल निगेटीव्ह तर 173 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 233  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 94 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 19500(16074+3249+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 121090 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 118707 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2006 नमुने होते. आजपर्यंत एकूण 120804 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 104730 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

173 पॉझिटिव्ह

आज सकाळी 153 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 24 महिला व 129 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील 30, मुर्तिजापूर येथील 21, मोठी उमरी व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी व शिवनगर येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, जूने शहर, न्यु तापडीया नगर व पंचशील नगर प्रत्येकी तीन, मुंडगाव, डाबकी रोड, रजपूतपुरा, रामदासपेठ, मारोती नगर, कॉग्रेस नगर, लहान उमरी, मलकापूर, कौलखेड, गोरक्षण रोड, पोलिस क्वॉटर, पिंपळगाव, वाशिम बायपास, सिंधी कॅम्प, सिरसो, गजानन नगर व हिंगणा रोड प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर उर्वरित रुईखेड, सिरसोली, वडाळी सटवाई, जऊळका, अकोली जहागीर, शिवणी, संभाजी नगर, खदान, नानक नगर, गिता नगर, निमवाडी, लक्ष्मी नगर, कसूरा, भारती प्लॉट, माळा नगर, शास्त्री नगर, न्यु खेतान नगर, वाडेगावदेशमुख फैल, तुकाराम चौक, बाळापूर रोड, रणपिसे नगर, माळीपुरा, आपातापा रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, राहुल नगर, अकोट फैल, जीएमसी, शिवाजी नगर, दताळा, बोरगाव खुर्द, गोडबोले प्लॉट, चहाचा कारखाना, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ, खैर मोहमद प्लॉट, व्हिएचबी कॉलनी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभुळगाव, घुसर, सिंधी कॅम्प, सांगवी बाजार, मलकापूर, तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 94 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 153, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 20 तर रॅपिड चाचण्यात 94 असे एकूण 267 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   233 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, बिहाडे हॉस्पीटल येथील सातसुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील ११, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, अवघाते हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून सहा, बॉईज हॉस्टेल अकोला येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, तर होम आयसोलेशन येथील ११० जणांना असे एकूण २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. त्यात सांघवी बाजार,अकोला येथील रहिवासी असलेली 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते, अन्य शास्त्री नगर, अकोला येथील रहिवासी असलेला 45  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 1 रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी असलेला 45 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 10 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

4769 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 19500(16074+3249+177) आहे. त्यातील 389 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 14342 आहे. तर सद्यस्थितीत 4769  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ