नागरिकांनी घरी उपचार न करता रुग्णालयात उपचार घ्यावे; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
अकोला,दि. 2(जिमाका)- कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव शहरी व ग्रामीण भागात सातत्याने मोठ्या प्रमाणावर
वाढत असून योग्य उपचार न मिळल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह
व उच्च रक्तदाब आजारी असलेल्या कोविड
रुग्णानी 10 ते 12 दिवस घरी उपचार घेतलानंतर नामाकिंत खाजगी
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आज त्यांचा मृत्यू झाले असल्याचे निर्देशान आले आहे.
तरी नागरिकांनी कोविडचे लक्षणे दिसताच स्वत:हून कोविड चाचणी करुन घ्यावी व कोविड
चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरी उपचार न घेता रुग्णालयात दाखल होवून योग्य उपचार घ्यावे,
असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यानी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये
आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता कुसूमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण,
मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी
डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीया
अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन
अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अश्वीनी खडसे, डॉ. अनुप चौधरी, जिल्हा परिषदचे प्रसार
माध्यम अधिकारी प्रकाश गवळी आदि उपस्थित
होते.
महानगर पालिका क्षेत्रात कोविड
चाचण्या वाढविण्याचे सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात लागू
करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करुन अनावश्यक घराबाहेर जावू नये,
प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य
असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. होम आसोलेशन सद्यास्थिती,
आसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबत यावेळी
आढावा घेतला. होमआयसोलेशन नियमाचे पालन न
करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावे, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी
दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा