प्रधानमंत्री मातृ वंदना योजना; 15 कोटी 30लक्ष 89 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

 



अकोला,दि.24 (जिमाका)-  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ गरोदर व स्तनदा माता यांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी त्यांच्या खात्यात थेट जमा होत असतो  या योजनेअंतर्गत जानेवारी 2017 ते आज पर्यंत 37 हजार 874 गरोदर व स्तनदा माता यांच्या खात्यात 15 कोटी 30 लक्ष 89 हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

            आज नियोजन भवनात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुकानू व संनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले ,मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अस्मिता पाठक जिल्हा कार्यक्रम  समन्वय अधिकारी आशा ठाकरे, सहाय्यक रवींद्र नगराळे यांची उपस्थिती होती.

देशामध्ये ही योजना जानेवारी 2017 पासून राबविण्यात येत आहे. प्रसूती अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या जिवंत बाळा करीता मातेस विश्रांती मिळण्यासाठी बुडीत मजुरीचा लाभ देणे, गर्भवती व स्तनदा मातांना योग्य पोषण तत्वे मिळण्यासाठी आर्थिक मदत, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी कल व सुदृढ माता हीच सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते हीच भावना या योजनेचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ गरोदर माता व स्तनदा मातानी घ्यावा ,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ