रात्री नऊ ते सकाळी सहावाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी व संचारबंदी लागू

 


अकोला,दि.28 (जिमाका)-  जिल्ह्यातील कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेवून  प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात रात्रीचे नऊवाजेपासून ते सकाळी  सहावाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी व संचारबदी  लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.

संचारबंदीच्या कालावधीत मुभा :

शासकीय तसेच खाजगी अॅम्बुलन्स सेवा,  रात्रीच्या वेळेस सुरु राहणारी औषधीची दुकाने, कर्तव्यावरील पोलीस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत व्यक्ती किवा वाहने,  कर्तव्यावरील रुग्णवाहतूक व हॉस्पीटल मधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, अत्यावश्यक सेवा, वीज, पाणी पुरवठा, दुरसंचार, औषधीची वाहने, अग्नीशमन, बँक व एटीएममध्ये पैसे भरणारी वाहणे व कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी, जीवनावश्यक वस्तुची सेवा, वस्तू व माल यांची वाहतूक व कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी, प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र छपाई वृत्तपत्र विक्रेते,  रात्रीच्या वेळेस सुरु राहणारे पेट्रोल पंप व हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे, रेल्वेने तसेच एसटी बस व प्रायव्हेट लक्झरी ने उतरणाऱ्या  प्रवाश्यांकरिता अँटोरिक्षा. तसेच   जिल्हादंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने व अधिकारी, कर्मचारी,  व्यक्ती यांना संचारबंदीच्या कालावधीत मुबा राहिल.  

 सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी ओळखपत्र व विशेष कार्यासाठी नेमणूकांबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल.  संबंधित व्यक्ती, संस्थासंघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत  करण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ