रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1897 चाचण्यात 118 पॉझिटीव्ह

 


          अकोला,दि. 28(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 1897  चाचण्या झाल्या त्यात 118  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 103  चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  पातूर येथे 13 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  तेल्हारा येथे 67 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  मूर्तिजापूर येथे 114 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेतून 1423  चाचण्या झाल्या त्यात 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 75 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 72 चाचण्या झाल्या त्यात 14  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बाळापूर येथे 11,  बार्शीटाकली येथे पाच, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 14  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 1897 चाचण्यात 118 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 59 हजार 705 चाचण्या झाल्या पैकी 4834 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ