1740 अहवाल प्राप्त, 338 पॉझिटिव्ह, 196 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

 


अकोला,दि.6 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1740 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1402 अहवाल निगेटीव्ह तर 338 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 196  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 18780(15554+3049+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 114688  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 112331 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1980 नमुने होते. आजपर्यंत एकूण 114270  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 98716 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

338 पॉझिटिव्ह

आज सकाळी 251 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 74 महिला व 177 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील 18, जीएमसी येथील 11, गोरक्षण रोड येथील नऊ, मुर्तिजापूर व उरळ खु. येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, तापडीया नगर, जूने शहर, मोठी उमरी, मोहला, आपातापा, व्याळा येथील प्रत्येकी सहा, गिता नगर, लहान उमरी, शिवनी व हिवरा कोरडे येथील प्रत्येकी पाच, हनुमान वस्ती, राम नगर व निंबी येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, शिवसेना वसाहत, जठारपेठ, खेतान नगर, मलकापूर, पातूर, झुरळ बु., मांडवा बू., वडाली देशमुख व कंजारा येथील प्रत्येकी तीन, किर्ती नगर, संत कंवर नगर, वृंदावन नगर, जवाहर नगर, मालीपुरा, गावित फैल, गड्डम प्लॉट, नेहरु नगर, तेल्हारा,कैलास टेकडी, बाळापूर, ब्रामी वाई, स्टेशन एरिया व माझोद येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पोलिस हेडक्वॉटर, हरिहर पेठ, खडकी, वानखडे नगर, ताजणा पेठ, पोला चौक, खदान, भिम नगर, सराफा बाजार, भुसारी हॉस्पीटल, आदर्श कॉलनी, बिर्ला गेट, तुकाराम चौक, पंचशिल नगर, हरिहर पेठ, बोरगाव मंजू, कलेक्टर कॉलनी, कपडा मार्केट, खोलेश्वर, बाळापूर नाका, लाल बंगला, दुबे वाडी, लेडी हार्डींग जवळ, मोहिते प्लॉट, मिलन नगर, नवाबपुरा, गौतम नगर, निमवाडी, गायत्री नगर, आनंद नगर, मराठा नगर, कृषी नगर, देशपांडे प्लॉट, गंगा नगर, दुर्गा चौक, राजेश्वर मंदिर, बालाजी नगर, भीम नगर, बाळापूर रोड, दिपक चौक, एपीएमसी मॉर्केट, दिनदा, बस स्टँण्ड, रामदासपेठ, हिंगणा रोड, कौलखेड,  राऊतवाडी, रवी नगर, येलवन, श्री नगर, डोंगरगाव, साने गुरुजी नगर, शास्त्रीनगर, काळा मारोती, चिवचिव बाजार, जाजू मॉर्केट, कृष्ण टॉवर, देऊळगाव, बालाजी नगर, गोयका नगर, अकोट, कळबेश्वर, कुरणखेड व पैलपाडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी 87 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 22 महिला व 65  पुरुषांचा समावेश आहे. त्यात पातूर येथील 19, लहान उमरी व मोठी उमरी येथील प्रत्येकी सात, रणपिसे नगर येथील सहा, कुरणखेड, जठारपेठ व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, पैलपाडा, जवाहर नगर, शास्त्री नगर, न्यु राधाकिसन प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित नेकलेस रोड, उत्तरा कॉलनी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत, मलकापूर, सांगळूद, मुर्तिजापूर, वर्धमान नगर, सातव चौक, मुकूंद नगर, माधव नगर, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, जूने शहर, म्हैसांग, गजानन नगर, शिवणी, आदर्श कॉलनी, खोलेश्वर, न्यु तापडीया नगर, लक्ष्मी नगर,काटेपूर्णा, अन्वी मिर्झापूर, निपाणा, भारतीय हॉस्पीटल, डाबकी रोड, दिपक चौक, जीएमसी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 251, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 87 तर रॅपिड चाचण्यात 53 असे एकूण 391 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   196 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 40, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील 12, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, आर्युवेदिक रुग्णालय येथून 12, अवघाते हॉस्पीटल येथून आठ, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून तीन, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील 92 जणांना असे एकूण 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात सिव्हील लाईन येथील रहिवासी असलेला 73  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 27 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होत, तर अन्य नायगाव, अकोला येथील रहिवासी असलेला 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 2 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

4533 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 18780(15554+3049+177) आहे. त्यातील 383 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 13864 आहे. तर सद्यस्थितीत 4533  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ