रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 3746 चाचण्यात 201 पॉझिटीव्ह


          अकोला,दि. 25(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.24) दिवसभरात झालेल्या 3746  चाचण्या झाल्या त्यात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोला येथे 150 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट येथे  239 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे एक चाचणी झाली त्यात एकाचा  अहवाल पॉझिटिव्ह आला, मूर्तिजापूर येथे 73 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिका येथे 3056 चाचण्या झाल्या त्यात 144 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,  अकोला आयएमए येथे 78 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 82 चाचण्या झाल्या त्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर तेल्हारा येथे 33, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 32 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 3746 चाचण्यात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 55 हजार 370 चाचण्या झाल्या पैकी 4479 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ