2310 अहवाल प्राप्त, 271 पॉझिटिव्ह, 92 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

 


अकोला,दि.7 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2310 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2039 अहवाल निगेटीव्ह तर 271 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 92  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 19120(15825+3118+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 116979 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 114613 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1989 नमुने होते. आजपर्यंत एकूण 116580 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 100755 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

271 पॉझिटिव्ह

आज सकाळी 196 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 49 महिला व 147 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 42, अकोट येथील 28, तेल्हारा येथील 13, कौलखेड येथील 11, मोठी उमरी येथील सहा, डाबकी रोड, खडकी, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ येथील चार, रनणपिसे नगर, रजपूतपुरा, सिंधी कॅम्प, जीएमसी, केशव नगर व कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, रतनलाल प्लॉट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, खदान, रामदास पेठ, सेलार फैल, टेलीकॉम नगर, तुकाराम हॉस्पीटल जवळ, जवाहर नगर, हरीहर पेठ व विद्यानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित निंभोरा, मित्रा नगर, शिवनी, पोला चौक, हिमायु रोड, सुधीर कॉलनी, सहकार नगर, किर्ती नगर, न्यु तापडीया नगर, कलेक्टर ऑफिस, अनिकेत, हिंगणारोड, तोष्णीवाल लेआऊट, खोलेश्वर, अंबीका नगर, प्रोबोधन नगर, सूर्या गार्डन, वर्धमान नगर, विठ्ठल नगर, सिव्हील लाईन, मुझफर नगर, चौरे प्लॉट, खिरपुरी, भारती प्लॉट, निमखर्दा, उमरी, तारफैल, केलकर हॉस्पीटल, सिटी कोतवाली, श्रध्दा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, दोनद खु., कोठीर वाटीका, जीएमसी हॉस्टेल, बाळापूर, सांगवी बाजार व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, तसेच आज सायंकाळी 75 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 63 पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील नऊ, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सात, अंबोसी ता.पातूर व सुकोडा येथील प्रत्येकी चार, राधाकिसन प्लॉट, कुटासा, सुकोडा, गोरक्षण रोड, वाशिंबा व सांगळूद येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शास्त्री नगर, अंत्री, भारती नगर, हाता, तरोडा शेगाव, बाळापूर, सातव चौक, हनुमान वस्ती, रणपिसे नगर, उमरी, कवर नगर, आदर्श कॉलनी, पंचशील नगर, दानोरी, वरुर जलका, जांभा बु., हिरपूर, बापोरी, रवीनगर, पारसकर शोरुम, गांधीग्राम, पंचमोरी, मिर्झापूर, शिवर, वनी रंभापूर, मलकापूर, जीएमसी, देशमुख फैल, पोळा चौक, सिव्हील लाईन, गड्डम प्लॉट व बाळापूर प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 196, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 75 तर रॅपिड चाचण्यात 69 असे एकूण 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   92 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील 10, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील 10,  आयकॉन हॉस्पीटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन,  अवघाते हॉस्पीटल येथून सहा, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, असे एकूण 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात वानखडे नगर, अकोला येथील रहिवासी असलेली 61  वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते., अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली, तर अन्य सांगळूद, बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेला 30  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

4779 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 19120(15825+3118+177) आहे. त्यातील 385 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 13956 आहे. तर सद्यस्थितीत 4779  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ