1870 अहवाल प्राप्त, 342 पॉझिटिव्ह, 312 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

 


अकोला,दि.2 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1870 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1528 अहवाल निगेटीव्ह तर 342 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 312  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 65 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 17015(14042+2796+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 106785 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 104555 फेरतपासणीचे 376 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1854 नमुने होते. आजपर्यंत एकूण 106641 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 92599  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

342 पॉझिटिव्ह

आज सकाळी 147 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 36 महिला व 111 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील 35, पातूर येथील 17, एमआयडीसी येथील 14,  बाळापूर येथील 12, गोरक्षण रोड, झुरल बु., डोंगरगाव व उगवा येथील प्रत्येकी पाच, पारस व उरल खु. येथील प्रत्येकी चार, गुडधी, हिवरखेड व गाडेगाव येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, गजानन पेठ, आगीखेड ता.पातूर, भरतपूर, खेडकर नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, वडद, अकोट, आकाशवाणी, विद्युत कॉलनी, अयोध्या नगर, अंतरी, मोरझडी, वाडेगाव,जवाहर नगर, शास्त्री नगर, अनिकेत, शिवणी, मोठी उमरी, आरएमओ हॉस्टेल, घुसर, बोरगाव मंजू, दोनद बु., डाबकी रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 195 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 67 महिला व 128 पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 42, पातूर येथील 18, मोठी उमरी येथील नऊ, बोर्डी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी आठ, कौलखेड, गौरक्षण रोड व राम नगर येथील प्रत्येकी सहा, कापसी येथील पाच, छोटी उमरी, मलकापूर, जीएमसी,  शास्त्री नगर, सुधीर कॉलनी, हरीहरपेठ येथील प्रत्येकी चार, राऊतवाडी, तुकाराम चौक, कुरणखेड, डाबकी रोड  व माधव नगर येथील प्रत्येकी तीन, विवेकानंद कॉलनी, रणपिसे नगर, वाशिम बायपास, टॉवर चौक, ज्योती नगर, जवाहर नगर, मोरेश्वर कॉलनी, खडकी व अकोट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित नवरंग सोयायटी, गजानन पेठ, लक्ष्मी नगर, खोलेश्वर, जयहिंद चौक, शिवणी, मारोती नगर, रेल्वे कॉलनी, राम नगर, बाळापूर रोड, गिता नगर, जूने शहर, देशमुख फैल, बाळापूर नाका, हनवडी, बाळापूर, निमवाडी, तोष्णीवाल लेआऊट, नायगाव, श्रीनाथ सोयायटी, व्हीएचबी कॉलनी, कॉग्रेस नगर, ओझोन हॉस्पीटल, जलतारे प्लॉट, गोरेगाव, त्रिमुर्ती नगर, जठारपेठ, तापडीया नगर, अंबिका नगर व भिम नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 65 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 147, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 195 तर रॅपिड चाचण्यात 65 असे एकूण 407 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   312 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 51, हॉटेल स्कायलार्क येथील 10, आर्युवेदिक महाविद्यालयातून 39, बिहाडे हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील पाच, युनिक हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटनल मुर्तिजापूर येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील 27, तर होम आयसोलेशन येथील 153 जणांना असे एकूण 312 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचे मृत्यू

दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात शिवनी, अकोला येथील रहिवासी  असलेली  58 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 25 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य राजेश नगर, अकोला येथीलहिवासी  असलेला 65  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या व्यक्तीस दि. 18 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3757 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 17015(14042+2796+177) आहे. त्यातील 372 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 12886 आहे. तर सद्यस्थितीत 3757  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना