रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 932 चाचण्यात 86 पॉझिटीव्ह

अकोला,दि. 10(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 932 चाचण्या झाल्या त्यात 86 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला येथे 209 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट येथे 218 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 15 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 79 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला महानगर पालिका येथे 195 चाचण्या झाल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 110 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 94 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बार्शीटाकळी येथे 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 932 चाचण्यामय 86 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 44 हजार 269  चाचण्या झाल्या पैकी  3419  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ