2518 अहवाल प्राप्त, 276 पॉझिटिव्ह, 331 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

 


अकोला,दि. 11 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2518 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2242 अहवाल निगेटीव्ह तर 276 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 331  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 20236(16655+3404+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 125493 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 123079 फेरतपासणीचे 378 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2036  नमुने होते. आजपर्यंत एकूण 125343 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 108688 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

276 पॉझिटिव्ह

आज सकाळी २२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४५ महिला व १८२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील २५, मुर्तिजापूर येथील १५, अंबुजा पारस येथील नऊ, डाबकी रोड व हरिहर पेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर येथील सात, मलकापूर, कौलखेड, खडकी व सहकार नगर येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी, रजपूतपुरा, बार्शीटाकळी, बाळापूर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्यकी चार,गजानन नगर, जठारपेठ, अनिकेत, बाळापूर नाका व अखातवाडी येथील प्रत्येकी तीन, खदान, हनुमान वस्ती, खोलेश्वर, पिंपळखुटा, विजय हाऊसिंग, गंगा नगर, तुकाराम चौक,  अकोट फैल, शिवनगर, न्यु तापडीया नगर, आळसी, गोरक्षण रोड, रामदासपेठ, सुधीर कॉलनी, निमवाडी, शिवर, भौरद, अकोट व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित चवरे प्लॉट, दुर्गा चौक, मुभी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, कैलास टेकडी, संतोष नगर, गिरी नगर,  अंबिका नगर, ओम हाऊसिंग, माधव नगर, मराठा नगर, ज्ञानेश्वरी नगरी,  रुख्मिनी नगर, जयहिंद चौक, पंचशील नगर, बाळापूर रोड, रेणूका नगर, दगडीपूल, मोहता मिल, मूंकूद नगर, सिव्हील लाईन, गौसरवाडी, रणपिसे नगर,अमनपूर, कृषी नगर, गिरी नगर, महमूद नगर, पोलिस हेडक्वॉटर, आनंद नगर, गांधी नगर, बायपास रोड, गिता नगर, गड्डम प्लॉट,  लोकमान्य नगर, शंकरविरा, नकक्षी, राऊतवाडी, मोहम्मद अली रोड, वानखडे नगर, न्यु भिम नगर, वरोडी, चिखलगाव, सावरा, प्रतिक नगर, ग्रीनलँड कॉटेजजवळ, बिर्ला रोड, तेल्हारा, तापडीयानगर, आरएलटी, लॅडीज फैल, अकोट फैल, गुलजारपुरा, चोहट्टा बाजार, खोबरखेड, सातव चौक, घुसर व परसोबढे येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील नऊ, शिवणी येथील पाच, राम नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, शास्त्रीनगर, खोलेश्वर व जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गोकूल कॉलनी, जीएमसी, एसबीआय कॉलनी, अडगाव, केशव नगर, राजीव गांधी नगर, सिंधी कॅम्प, शिवसेना वसाहत, रामदासपेठ, टीएचओ ऑफीस, बक्षी हॉस्पीटल, रतनलाल चौक, मोठी उमरी, महान, रणपिसे नगर, मलकापूर, न्यु बैद्यपूरा, पोला चौक, मालीपूरा, देवरावबाबाची चाळ, अकोट फैल, रतनलाल प्लॉट व तेल्हारा  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 227, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 49 तर रॅपिड चाचण्यात 69 असे एकूण 345 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   331 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच,  आयकॉन हॉस्पीटल येथून सात, नवजीवन हॉस्पीटल येथून एक,कोवड केअर सेंटर समाज कल्याण हॉस्टेल येथून १५, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील ३२, सहारा हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून १०, तर होम आयसोलेशन येथील २२५ जणांना असे एकूण ३३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज सांयकाळी खाजगी रुग्णालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात गोरक्षण रोड येथील रहिवासी असलेला ४६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पिंपलखुटा ता. बार्शिटाकळी  येथील रहिवासी असलेला ४४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते., अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

4849 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 20236(16655+3404+177) आहे. त्यातील 393 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 14994 आहे. तर सद्यस्थितीत 4849  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ