रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 490 चाचण्यात 66 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 14(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.13) दिवसभरात झालेल्या 490 चाचण्या झाल्या त्यात 66 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 69 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 17 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 214 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 76 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्याचे 31 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 70 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बार्शीटाकळी येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 490 चाचण्या 66 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 45 हजार 923  चाचण्या झाल्या पैकी  3630  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ