शासनाचे मार्गदर्शक सूचना जाहिर; महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करा


अकोला,दि. 10 (जिमाका)- जिल्ह्यात कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेता तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्याबाबत मागदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

मार्गदर्शक सूचना :

महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवापैकी एक मोठा उत्सव असून देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठया उत्साहाने साजरी करतात, १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील भिमाशंकर, परळीबैजनाथ, त्र्यंबकेश्वर, आँढा नागनाथ व घृष्णेश्वर या देवस्थानी तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दर्शनाकरीता मोज्या प्रमाणात गर्दी करीत असतात. परंतु यावर्षी कोविड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व मंदिर  ट्रस्टी, व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील,  दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात मोठया प्रमाणात पूजाअर्चा केली जाते व दर्शनासाठी अनेक भाविक त्याठिकाणी गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भाविकांनी घराबाहेर न पड़ता शक्यतो घरात राहून पूजाअर्चा करावी, यासाठी प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती करणे  आवश्यक आहे.

कोविक- १९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सोशल डिस्टन्सींगचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त ५० भाविक दर्शन घेतील, यादृष्टीने संबंधित विश्वस्त अथवा व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निजंतुकीकरणाची  व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सेनीटायझर, इ. चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टींगच्या नियमाचे तंतोतंत पालन होईल, याकडे मंदीराचे व्यवस्थापक व स्थानिक प्रशासन यांनी विशेष

लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत, प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वत:हून मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेष्ठ नागरीक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये, महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी, कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे प्रशासनाव्दारे कळविण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ