एमपीएससी राज्यसेवा (पुर्व) परीक्षेचे आयोजन

 


अकोला,दि.20 (जिमाका)-  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्ह्यात रविवारी (दि. 21) रोजी  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर सकाळी 10 ते 12  दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे. एमपीएससी परीक्षेकरीता एकुण 4 हजार 977 उमेदवार परिक्षा देण्यार असून  परिक्षेकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आले आहे. त्यात पाच समन्वय अधिकारी, 18 उपकेंद्रप्रमुख, 76 पर्यवेक्षक तर 244 समवेक्षक यांची सेवा परिक्षेकरीता घेण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

            कोवड प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आले आहे. त्याकरीता परीक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी करण्यात आले असून  चाचण्या करण्यात आलेल्या एकूण 374 नमुनेपैकी  28 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेले कर्मचाऱ्‍यांना बदलुन त्यांचेऐवजी अतिरीक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक उपकेंद्रावर बेसीक कोविड किट (Basic Covid kit), परीक्षेकरीता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवार हातमोजे, मास्क, सॅनिटायर दिल्या जाणार आहे.  तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना  फेसशिल्ड, हातमोजे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात येणार आहे. कोरोना विषाणुची लक्षणे दिसुन येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरीता Personal Protetive Eqipment Kit (PPEK)  दिल्या जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ