थेट संपर्कात असलेल्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य --पालकमंत्री ना. बच्चु कडू



अकोला,दि.12 (जिमाका)-   जिल्ह्यात  वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी  भाजीपाला विक्रेते  दुग्ध व्यवसायी किराणा व्यवसाई व किरकोळ व्यवसायी अशा थेट  संपर्कात येणा-या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे  अनिवार्य असल्याचे  निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण,   महिला व बालविकास   इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,   भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण,   कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ   बच्चू कडू यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.

आज दि.12 रोजी  जिल्हाधिकारी भवनाच्या नियोजन भवनात कोविड 19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी  विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया, आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, मनपा आयुक्त  निमा अरोरा,  मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,  पोलीस अधिक्षक जी. श्रीधर,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजबिये,  उपअधिष्ठात  डॉ. कुसूमाकर घोरपडे,   अपर पोलिस अधिक्षक मोनिका  राऊत यांची उपस्थिती होती.

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   नागरिकांच्या कोविड चाचण्या  वर भर देणे आवश्यक असुन पॉझिटीव रूग्णाच्या संपर्कातील त्यांचे कुटूंबीय व इतर व्यक्तींचा  कॉन्ट्रॅक ट्रेस करून  कोविड चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच  होमकॉरनटाईन  केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून  ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच  ज्या व्यक्तींच्या घरी  होम कॉरनटाईनची व्यवस्था नसेल अशा व्यक्तींना  संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे.  लग्न समारंभावर लक्ष ठेवून नियमाचे उल्लघंन     करणा-या वर  कार्यवाही करावी.

 आठवडी बाजार  सध्‌दस्थितीत  बंद आहेत परंतू भविष्यात आठवडी बाजार  सुरू करण्याबाबत नियोजन करणे  आवश्यक आहे. यासाठी आठवडी बाजारात  येणा-या  दुकानदार  व व्यापारी यांची  कोरोना  चाचण्या  कराव्यात व  आठवडी बाजार सुरू  करण्याबाबत नियोजन करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात.

 कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

पालकमंत्री ना. बच्चु कडू यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाबत आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारु विक्री नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले. पोलिस स्टेशनमध्ये वाचनालय व  व्यायाम शाळा असने गरजेचे असुन यासाठी नियेाजन करावे. अशा सुचना त्यांनी दिल्यात. शहरात कोणी भिकारी  भिक मागतांना  दिसणार  नाही  यासाठी मनपा व पोलिस विभागाने संयुक्त कार्यवाही करून  भिकारी मुक्त शहर ही योजना राबवावी व  भिका-यांना निवारा केंद्रात  पोहचवून त्यांच्यावर   संस्कार करावेत  असेही त्यांनी  सांगितले.

पालकमंत्री ना. बच्चु कडू यांनी  जलजीवन  मिशन योजनेचा आढावा  यावेळी घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा