शनिवार व रविवारचे लॉकडाऊन रद्द; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत निर्बंधासह सुरु

 


अकोला,दि. 12(जिमाका)- जिल्ह्यातील शनिवार व रविवारचे लॉकडाऊन रद्द करुन सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत निर्बंधासह सुरु ठेवण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण,   महिला व बालविकास   इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,   भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण,   कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू यांनी दिले.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून दि. 4 मार्चच्या आदेशाव्दारे येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारीचे रात्री आठवाजेपासून ते सोमवारचे सकाळी सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. यापूर्वीच्या आदेशातील संचारबंदीचा मुद्दा पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू  यांच्या निर्देशानुसार रद्द करुन इतर बाबी पुढील निबंर्धासह सुरु राहिल. तसेच कोविड-19 चा फैलाव होवू नये या करिता वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेले आदेशांचे उललंघन होणार यांची दक्षता घ्यावी, असे  अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ