महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परिक्षा - 2021
जिल्ह्यातील
18 केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू
अकोला,दि.
18(जिमाका)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र
लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परिक्षा रविवारी (दि. 21) जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर सकाळी 10 ते 12 व दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर परिक्षा शांततेत
पार पाडण्याकरिता रविवार दि. 21 मार्चचे सकाळी सहा ते
सायंकाळी आठ वाजेपर्यंत परीक्षा
केंद्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या 100 मीटर
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
शिवाजी आर्ट,कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मुर्तीजापूर रोड, नेहरू पार्क, अकोला, खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट गोरक्षण रोड अकोला, सिताबाई कला महाविद्यालय सिव्हील लाईन रोड अकोला, शिवाजी आर्ट, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज पुर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड अकोला, दि.नोएल इंग्लिश हायस्कूल विभागीय वर्कशॉपच्या मागे, कौलखेड रोड अकोला, भारत विद्यालय तापडीया नगर अकोला, जागृती विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय,रणपीसे नगर अकोला, न्यु इंग्लिश हायस्कूल, शिक्षण संकुल, रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला अकोला, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल / ज्युनिअर कॉलेज शिक्षण संकुल, रामदासपेठ अकोला, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट, डाबकी रोड जुने शहर, अकोला, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉटस डाबकी रोड जुने शहर अकोला, होलीक्रॉस कॉन्व्हेन्ट हायस्कूल, जठारपेठ चौक अकोला, श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ जुने शहर अकोला, गुरूनानक विद्यालय, गांधीनगर, सिंधी कॅम्प अकोला, डि.ए.व्ही कॉन्व्हेन्ट स्कूल महात्मा गांधी रोड, अकोला, बी.आर. हायस्कूल ताजनापेठ मुख्य डाक घरामागे अकोला या 18 ठिकाणी परिक्षा होणार आहे.
परीक्षा
केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच
पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरीत्या प्रवेश करणार नाहीत,
कोणत्याही
प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत, परिक्षा
केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व
परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे
थर्मल व इफ्रारेड थर्मामिटरव्दारे तापमान
तपासण्यात यावे. हवा खेळती राहण्याचे दृष्टीने
परिक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडया ठेवण्यात याव्यात,
सर्व अधिकारी, कर्मचारी
तसेच परिक्षार्थी यांना मास्कचा वापरने बंधनकारक
राहिल. मास्क लावल्याशिवाय प्रवेश देण्यात येवू नये, प्रत्येक
परिक्षार्थीमध्ये किमान तीन फुटाचे
अंतर राहिल अशी बैठक व्यवस्था असावी,
परिक्षा केंद्राचे प्रवेशव्दारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात
यावी, परिक्षा केंद्राच्या परिसराची
सोडियम हायपोक्लोराईटच्या साह्याने
निर्जंतुकीकरण करण्यात यावे, कोणत्याही
परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी
यांना कोव्हिड-19 ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रूग्णालयात भरती
करावे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात
परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल,
असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत, परीक्षा
केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,
फॅक्स मशीन, पानपट्टी,
लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ,
ध्वनीक्षेपक, इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत
बंद ठेवण्यात येतील, परीक्षा केंद्राचे परिसरात
इंटरनेट, मोबाईल फोन,
सेल्युलर फोन, ई मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून
प्रवेश करण्यास मनाई राहील, परीक्षा
केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती व
वाहनास प्रवेशास मनाई राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा