1568 अहवाल प्राप्त, 258 पॉझिटिव्ह, 525 डिस्चार्ज, तीन मयत

 


         अकोला,दि.28 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1568 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1310 अहवाल निगेटीव्ह तर 258  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 525  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर तीन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 118  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 27200(22258+4765+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 153602 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 151000,  फेरतपासणीचे 379  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2223  नमुने होते. आजपर्यंत एकूण 153458 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 131200   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 258 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 258 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी १७५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५१ महिला व १२४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा व पारस येथील प्रत्येकी ११, पलसखेड व मलकापूर येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सहा, गोरक्षण रोड, शिवर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी, डाबकी रोड, कुंभारी, एमआयडीसी व गोकूल कॉलनी येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, दानापूर, जीएमसी, अकोट, येवता, लहान उमरी, मोठी उमरी व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, गाडगे प्लॉट, हरिहर पेठ, शास्त्री नगर, नवरंग सोसायटी, गिता नगर, वाशिम बायपास, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, पातूर, सिंधी कॅम्प, बाळापूर व व्हीएचबी कॉलनी येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित मडकेवाडी, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, देशपांडे प्लॉट, आयकॉन जवळ, गणपती गल्ली, खरप, मुर्तिजापूर, वरखेड, खिरपूर बु., टाकळी, ताजनगर, इंद्रायणी कॉलनी, हिंगणा, आरटीओ रोड, श्रद्धा नगर, रामदासपेठ, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, आदर्श कॉलनी, जूने शहर, स्नेहा नगर, खोलेश्वर,माणिक टाँकीज, बोरगाव मंजू, बाबुळगाव जहॉगीर, वाजेगाव, नया अंदुरा, अमंतपूर, विजोरा, गुडधी, बिर्ला रेल्वे क्वॉटर, पनखेड, तापडीया नगर, चांदुर, सावंतवाडी, कंवरनगर, नयागाव, बाळापूर नाका, लेडी हार्डींग, बाबुळगाव, बाळापूर रोड, वनी, पिंपळखुटा, हिंगणा, जैन चौक, पंचशिल नगर व तारफैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ८३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २८ महिला व ५५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी व रामदासपेठ येथील प्रत्येकी पाच, गोयका नगर व मलकापूर येथील प्रत्येकी चार, कौलखेड, डाबकी रोड व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, गायगाव, जूने शहर, महान, कृषी नगर, जठारपेठ, अशोक वाटीका, गायगाव व पिंपळखुटा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कॉग्रेस नगर, नांदखेड, खदान, अकोट, दहिहांडा, मारोती नगर,गंगा नगर, श्रीहरी नगर, हिरपूर, पुरणखेड, समता नगर, खरप ढोरे, स्टेशन एरिया, काटेपुर्णा, सलू बाजार, तळेगाव, दगडपारवा, सहकार नगर, तापडीया नगर, विकास नगर, रामकृष्ण नगर, रणपिसे नगर, केळपाणी, सिटी कोतवाली, रेणूका नगर, बलोदे लेआऊट, खोलेश्वर,  शिवसेना वसाहत, शिवाजी नगर, रजपूतपुरा, गुलजारपुरा, रिधोरा, केशव नगर, चोहट्टा बाजार, नेरधामणा, रामनगर, जीएमसी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.27) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 118 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 175, सायंकाळी प्राप्त अहवालात 83 तर रॅपिड चाचण्यात 118 असे एकूण 376 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  तिघांचा मृत्यू

दरम्यान आज सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात कैलास टेकडी, अकोला येथील ६३ वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २८ रोजी मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अन्य ३५ वर्षीय अनोळखी पुरष रुग्णास दि. २८ रोजी मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तसेच गंगानगर, अकोला येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

525 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, हॉटेल स्कायलार्क येथून आठ, इंद्रा हॉस्पीटल येथून दोन, सहारा हॉस्पीटल येथून एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथून दोन, यकिन हॉस्पीटल येथून तीन, नवजीवन हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, तर होम आयसोलेशन येथील ४२४, असे एकूण ५२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6494 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 27200(22258+4765+177) आहे. त्यातील 446 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 20260 आहे. तर सद्यस्थितीत 6494 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ