पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.11 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. 12 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 12 रोजी दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 1 वा. 20 मि. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व  दुपारी 1 वा. 30 मि. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व नागरी दलीतेत्तर वस्ती समितीची आढावा बैठक, दुपारी 2 वा. 15 मि. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक व दुपारी 3 वा.30 मि. कोविड-19 बाबत आढावा बैठकीत उपस्थिती.  सायंकाळी 5 वा. 30 मि. शासकीय विश्रामगृह, अकोलाकडे प्रयाण, सांय. 5.45 वाजता शासकीया विश्रामगृह येथे राखीव व सवडीने अमरावती कडे प्रयाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ