रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1102 चाचण्यात 94 पॉझिटीव्ह


अकोला,दि. 9(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 1102 चाचण्या झाल्या त्यात 94 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला येथे 264 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे 257 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे एक चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 218 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला महानगरपालिका येथे 250 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 38 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 60 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे  एकूण 1102 चाचण्यांमधून 94 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 43 हजार 337  चाचण्या झाल्या त्यापैकी  3333  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ