रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 607 चाचण्यात 65 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 2(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.1) दिवसभरात झालेल्या 607 चाचण्या झाल्या त्यात 65 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
आज दिवसभरात अकोट येथे 259 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,
बार्शीटाकळी येथे एक चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे
139 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 38 चाचण्या
झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,
मुर्तिजापूर येथे 22 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला
आयएमए येथे 13 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 60 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 67 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आला, अकोला येथे दोन व बाळापूर
येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,
असे एकूण 607 चाचण्यांमधून 65 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 272 चाचण्या झाल्या पैकी 2863 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा