रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1422 चाचण्यात 49 पॉझिटीव्ह


 

          अकोला,दि. 26(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 1422  चाचण्या झाल्या त्यात 49 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 118 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 49 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मूर्तिजापूर येथे 63 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 63 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 32  चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 83 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 1000 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 1422 चाचण्यात 49 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 56 हजार 792 चाचण्या झाल्या पैकी 4528 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ