918 अहवाल प्राप्त, 137 पॉझिटिव्ह, 789 डिस्चार्ज, दोन मयत


         अकोला,दि.31(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 918 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 781 अहवाल निगेटीव्ह तर 137  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 789  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 119  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 27700(22512+5011+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 155098 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 152485,  फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2234  नमुने होते. आजपर्यंत एकूण 155018 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 132506 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

137 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 137 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी ९१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३३ महिला व ५८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मलकापूर येथील सात, जठारपेठ येथील पाच, मोठी उमरी व केशव नगर येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, रामदासपेठ व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, उरळ, अकोट, देवरी, पारस, न्यु तापडीया नगर, लहान उमरी, निबंधे प्लॉट, जूने शहर, राऊतवाडी, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट, राम नगर व शिवणी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कृषी नगर, खंडाळा, एमआयडीसी, मिर्झापूर, भौरद, मनारखेड, शेळद, कादवी, देशमुख फैल, बिर्ला राम मंदिर, रामगाव, गजानन नगर, डाबकी रोड, सांगळूद, कोठारी वाटीका, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, पारस, हिंगणा रोड, आदर्श कॉलनी, विजय नगर, शंकर नगर, पातूर, तारफैल, घुसर, अयोध्या नगर, आर्युवेदिक कॉलज, सिव्हील लाईन, निंभा ता.मुर्तिजापूर, शिवापूर, खडकी, बालाजी नगर, राधाकृष्ण टॉकीज व कुंभारी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १७ महिला व २९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी येथील पाच, डाबकी रोड येथील चार, तारफैल येथील तीन, तुकाराम चौक व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित म्हैसपूर, प्रतिकनगर, आसरा कॉलनी, पंचशील नगर, आगर, तेल्हारा, बाळापूर, शिवणी, अनिकट, खोलेश्वर, नवरंग सोसायटी, गौरक्षण रोड, आळशी प्लॉट, शिवनगर, रजपूतपुरा, मोठी उमरी, अयोध्या नगर, गंगा नगर, विजय नगर, गोकूल कॉलनी, शिवाजी पार्क, दुर्गा चौक, तोष्णीवाल लेआऊट, रतनलाल प्लॉट, अंभोरा, गणेश नगर, समता नगर, पळसोळा, माना व राहित येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.30) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 119 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 91, सायंकाळी प्राप्त अहवालात 46 तर रॅपिड चाचण्यात 119 असे एकूण 256 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात बोलके प्लॉट, अकोट येथील ७० वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी व्दारका नगरी, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

789 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, सहारा हॉस्पीटल येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, खैर उम्मीद हॉस्पीटल सोनोरी मुर्तिजापूर येथे दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, बाईज हॉस्टेल अकोला येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील पाच, आर्युवेदिक महाविद्यालयातून १७, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, इंद्रा हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील आठ, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील ६७१ जणांना असे एकूण ७८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5784 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 27700(22512+5011+177) आहे. त्यातील 453 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 21463 आहे. तर सद्यस्थितीत 5784 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ