2073 अहवाल प्राप्त, 76 पॉझिटिव्ह, 153 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

 


अकोला,दि.8 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2073 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1997 अहवाल निगेटीव्ह तर 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 153  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर एक रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 37 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 19233(15901+3155+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 118909 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 116539 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1993 नमुने होते. आजपर्यंत एकूण 118653 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 102752 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

76 पॉझिटिव्ह

आज सकाळी 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 28 महिला व 48 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील सहा, स्वाद बेकरी येथील पाच, जीएमडी मार्केट, कौलखेड, रामदासपेठ व भंडारज बु. येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, खडकी, कान्हेरी सरप, व्हीएचबी कॉलनी, गिता नगर, शास्त्री नगर, राम नगर, जठारपेठ, लाल बंगला, रेल्वे स्टेशन चौक, गोडबोले प्लॉट व बाळापूर प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, आदर्श कॉलनी, बाळापूर रोड, लाखोडा, रामझींग हॉटेल, बिर्ला कॉलनी, सिंधी कॅप, अलंदा, पोलिस हेडक्वॉटर, गोरक्षण रोड, मलकापूर, सावतावाडी, हिंगणा फाटा, गांधी रोड, आरटीओ रोड, वाशिम बायपास, जयहिंद चौक, बाळापूर नाका, तारफैल, मुझफर, खोलेश्वर, दगडी पूल, नयागाव, बैदपुरा, पातूर, रजपूतपुरा, जीएमसी, मोठी उमरी व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच सांयकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 37 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 76, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात निरंक तर रॅपिड चाचण्यात 37 असे एकूण 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   153 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील १६, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा,  सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, युनिक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून १६, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून दोन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक, बॉईज हॉस्टेल अकोला येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून तीन,  तर होम आयसोलेशन येथील २९ जणांना असे एकूण १५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. त्यात रवी नगर, अकोला येथील रहिवासी असलेला 61  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 1 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

4738 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 19233(15901+3155+177) आहे. त्यातील 386 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 14109 आहे. तर सद्यस्थितीत 4738  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ